Blogger: My Inward Eye..... - Create post

LinkWithin

http://kundha.blogspot.com http://prajaktad.blogspot.com

Wednesday, August 19, 2009





श्रीकृष्ण जयंती




श्रीज्ञानेश्वर महाराज जयंती......




पसायदान




आता विश्वात्मके देवें / येणे वाग्यज्ञें तोषावे / तोषोनि मज द्यावें / पसायदान हें //१//


आतां म्हणजे श्रीमत् ज्ञानेश्वरी या भगवत् गीतेवरील टीकाग्रंथाचे कार्य पूर्ण झाल्या नंतर विश्वात्मक प्रभू ने - सदगुरू निवृत्तीनाथानी मी हा जो वाग्यज्ञ केला त्यामुळे माझ्यावर प्रसन्न व्हावे आणि त्या प्र्स्न्न्तेतून मला हे पसायदान द्यावे .


जे खळांची व्यंकटी सांडो / तया सत्कर्मी रति वाढो / भूतां परस्परे पडो /मैत्रजीवांचे //२//


.या विश्वात जी खलवृत्तीची - दुष्ट प्रवृत्तीची मंडळी असतील त्यांचे खलत्व म्हणजे दुष्टपणा -वाकडेपणा जावो . त्याना सत्कर्मात आवड निर्माण होवो आणि ती आवड दिवसेदिवस वर्धिष्णु होवो. सर्व प्राणिमात्रांना एकमेकाविषयी प्रेम निर्माण होवो .




दुरितांचे तिमिर जावो / विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जें वांछील तो तें लाहो / प्राणिजात //३//


अज्ञानामुळे घडणारे जे पाप,त्या पापाचा अंधकार नष्ट होवो. विश्वाची सर्व कर्मे स्वधर्माच्या प्रकाशामध्ये होवोत आणि आपली विश्वाकडे पाहण्याची दृष्टी ही स्वधर्माच्या स्वरुपबोधाच्या प्रकाशामध्ये असो . असा जो साधक असेल त्याची जी इच्छा असेल ती बहुधा पारमार्थिकच असणार ती त्याची इच्छा पूर्ण होवो.


वर्षत सकळमंगळी / ईश्वर निष्ठाची मांदियाळी / अनवरत भूमंडळीं / भेटतु या भूतां //४//


सर्व मांगल्याचा वर्षाव करणारा , ईश्वरनिष्ठ संताचा समुदाय अखंड त्या साधकाला भेटो


चलां कल्पतरूंचे आरव/ चेतना चिंतामणीचें गांव / बोलते जें अर्णव / पीयुशाचे //५// चंद्रमे जें अलांछन / मार्तंड जें तापहीन / तें सर्वांही सदा सज्जन / सोयरे होतु //६//


संत म्हणजे जणू चालते बोलते कल्प्तारुंचे कोवले कोवले कोम्ब असतात । चिंतामणि सर्व ऐहिक इच्छा पूर्ण करतो । पण हे संत साधकांच्या पारमार्थिक इच्छा पूर्ण करणारे चैतन्यरूप चिंतामणि रत्नांचे गाँव असतात । हे संत बोलायला लागले की जणू अमृताचा सागर उंचबलतो आहे असे वाटते ।


चन्द्रमा लांछित आहे पण हे संत कुठलेही लांछन न नसलेले निष्कलंक चंद्रमा आहेत। ताप न देणारे हे सूर्य आहेत । हे संतसज्जन सुष्ट दुष्ट सर्वाना नेहमीच आपल्या सोयरा प्रमाने होवोत .


किंबहुनाn सर्वसुखी / पूर्ण होऊनि तीही लोकी /भजिजो आदिपुरुखी / अखंडित //७//


साधकाने ऐहिक आणि पारत्रिक सर्व सुखाने तिन्ही लोकात परिपूर्ण होऊंन त्या आदिपुरुशाला अखंडित भजावे ।



आणि ग्रंथोपजीविये / विशेषी लोकी इये / दृष्टादृष्टविजये / होआवें जी //८//

ज्ञानऐश्वारित सांगितल्या प्रमाणे जो जीवन जगत असेल त्याला या कलियुगात वर्त्तमान परिस्थितीत ऐहिक आणि पारत्रिक ऐश्वर्य प्राप्त होवो ।


तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो / हा होईल दानपसावो /येणे वरें ज्ञानदेवो / सुखिया जाला //९//


त्यावर विश्वाचे स्वामी श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात 'तू मागीतलेले हे पसायदान पूर्ण होईल 'या सद्गुरुंच्या आशीर्वादाने ज्ञानदेवाना अतिशय संतोष झाला । ................स्वामी माधवनाथ पुणे .


No comments: