Blogger: My Inward Eye..... - Create post

LinkWithin

http://kundha.blogspot.com http://prajaktad.blogspot.com

Wednesday, February 17, 2010

तुकाराम गाथा

उपकारासाठी केले हे उपाय \ येणेविण काय चाड आम्हां //">file://१//
बुडता हे जन न देखवे डोळां \ येतो कळवळा म्हणउनि
//">file://२//
तुका म्हणे माझे देखतील डोळे \ भोग देतेवेळे यईल कळो
//">file://३//
दिवाकर अनंत घैसास म्हणतात ;
जगातील संसारी माणसांची दुःख॓ साक्षीभावाने पहातांना तुकाराम महाराजांना फार कळवला येत असे . आपल्याला जो हरिभक्तीचा मोठा ठेवा सापडला आहे आणि इतर लोकाना जर तो लाभ झाला तर किती तरी बरे होईल, असे त्यांना वाटे.
ते ज्या दुःखमय स्तिथीचे प्रत्यक्ष्य अनुभव घेत होते त्यातही विठ्ठलभक्ती मुळे त्यांचे चित समतोल रहात होते , पण बाकीचे लोक मात्र भगवंताचा हा आधार नसल्यामुळे दुःखांनी व संकटांनी गांजून जातात , त्यांची दैनावस्था पाहून महाराज फार तळमळीने त्याना सांगतात की बाबांनो आता या दुःखावर एकच उपाय तो म्हणजे हरिनाम घेणे . >देवाला शरण जाणे, त्याचीच अनन्य भक्ती करणे. पण लोकांना वाटे की माहाराजांना हे उद्योग करायची काय जारुरी होती? त्याला उत्तर म्हणून माहाराज म्हणतात - हे हरिभक्ती चे उपाय मी सांगतो ते लोकांच्या उद्धारा साठी, लोकांना दुःखातून मुक्ती मिळावी म्हणून , नाहीतर मला लोकांशी काय करायचे आहे?