Blogger: My Inward Eye..... - Create post

LinkWithin

http://kundha.blogspot.com http://prajaktad.blogspot.com

Saturday, June 6, 2009

तुकाराम गाथा......


वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा / येरांनी वाहावा भार माथा //१//
खादल्याची गोडी देखिल्यासी नाही / भार धन वाही मजुरीचे //२//
उत्पत्ति पाळणं-संहाराचे निज / जेणे नेले बीज त्याचे हाती //३//
तुका म्हणे आम्हा सांपडले मूळ / आपणचि फळ आले हाता //४//

दिवाकर अनंत घैसास म्हणतात....
"वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा / येरांनी वाहावा भार माथा" हे तुकारामा चे विधान वरवर पाहाता मोठे धृष्टतेचे वाटते आणि म्हणूनच अनुभवाच्या मार्गाने ब्राह्मस्थिति पोहोचणार्या संतांची बाजू मांडण्यासाठी या विधानाचा मराठी साहित्यात वारंवार उपयोग केला जातो महाराज . म्हणतात , जो एखाध्या खाद्य पदार्थाचे नुसते वर्णन करतो किंवा वर्णन ऐकतो किंवा तो खाद्य पदार्थ नुसता पाहातो त्याला प्रत्यक्षात त्या पदार्थाची चव कशी आहे, त्याची गोडी, शरीरावर होणारे त्याचे भलेबुरे परिणाम,त्याचे खरे गुण यांचा अनुभव येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे वेदांतील ब्रम्हस्थितीची वर्णने तोंडपाठ करणार्यांपेक्षा "एकं सत् विप्रः बहुधा वदन्ति /"अशासारख्या "सत्य एकच आहे व प्रज्ञावंत त्याला निरनिराळी नावे देतात एवढेच -" हे सांगणार्या वचनाचा अर्थ जे संत , योगी स्वानुभवाने एकत्वाची प्रचीती घेतात त्यांनाच जास्त समजतो. पाठांतर करणार्याना फक्त मेंदूत सर्व शब्द साठवून पुनरुच्चार करण्याचे श्रम पडतात.
तसेच आम्हा संताना हे माहित आहे कि जो जगाची ,वेदांचीही - उत्पत्ती करतो , पालन करतो संहार करतो त्या परमेश्वराच्याच हाती या सृष्टीचे मूळ बीज आहे आणि आम्ही संतांनी ते मूळ बीज ॐ कार रूपाने ,सोहम रूपाने अनुभवून आत्मसात् केले आहे. ज्याअर्थी या प्रमाणे मूळ आम्हाला गवसले आहे त्याअर्थी संसाराचे परमोच्य फळ जी मुक्ती तीही आम्हाला प्राप्त आहे कारण कारणातच कार्य हे समाविष्ट असते. मजुराने धनाची पेटी वाहून नेली तरी त्याला ते धन मिळात नाही तसे वेद पठणाचे श्रम करणार्याना त्यातील अर्थाचे ज्ञान होत नाही असे इथे दृष्टांताने त्यांनी सांगितले आहे. .

No comments: