सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती \ रखुमाईच्या पती सोयरिया \\१\\
गोड तुझे रूप गोड तुझे नाम \ देई मज प्रेम सर्वकाळ \\२\\
विठो माउलिये हाची वर देई \ संचरोनिया राही हृदयामाजी \\३\\
तुका म्हणे कांहि न मागे आणिक \ तुझे पायीं सुख सर्व आहे \\४\\
दिवाकर अनंत घैसास म्हणतात.....आपण रोज केव्हातरी थोडा वेळ देवाच्या मूर्ति चे ध्यान करतो , मूर्ति समोर काही अर्पण करतो , नमस्कार करतो ,दर्शन घेतो ,प्रदक्षिणा घालतो ,घंटानाद करतो आणि मग नित्य व्यवसायाला लागतो. पण आपल्या डोल्यांसमोर देवाची मूर्ति कही निरंतर नसते. व्यवहारिक गोष्टींचेच ध्यान मग चालू असते . "संसार मुख्यः फवल्या वेळात देव" असा आपला दिनक्रम असतो. खरी गोडी आपल्याला इतर विषयांची असते . बाह्य पदार्थाचे सौंदर्या आपणाला भूल पाड़ते. तुकाराम महाराज मात्र देवाजावळ असे मागतात की त्यांच्या डोळ्या पुढे त्यांची मूर्तीच सदा सर्वकाळ राहवी; अन्य चिंतनच नको. रुक्मिणीचा पती पांडुरंग त्याना सोयरा वाटतो . त्याचे रूप तर गोडच आहे, नाम तर जास्तच गोड आहे मग त्यानी देवाला म्हटले की तुझे प्रेम मला सर्वकाल मिळूदे ! माझ्या मनात तुझ्याबद्दलचे प्रेम सर्वकाळ राहू दे ;आणि पांडुरंगा पुढे विठुमाऊली होतो !ती विठाई तुकरामाच्या ह्रदयात नित्य संचारून राहो !अर्थात् ह्रदयस्थ परमेश्वरच सदा सर्वदा जाग्रत राहों ! बाह्य मूर्ति बाहेर नाही रहात ! अंतरबाह्य तोच पांडुरंग चैतन्यरुपात नांदू लागतो . अशा पांडुरंगाच्या अक्षय शाश्वत चरणांशीच सारे काही सुख आहे, म्हणूनच तुकारामाची मागणी त्या विठू माऊलीने त्यांचे जीवनच व्यापून राहावे अशी आहे . इश्वरः सर्वभूतानाम हृद्देशे तिष्टति याची अनुभूति सतत यावी अशी ही प्रार्थना आहे .
No comments:
Post a Comment