मन करा रे प्रसन्न \ सर्व सिद्दींचे कारण \ मोक्ष अथवा बंधन \सुख समाधान इच्छा ते \\१\\ मने प्रतिमा स्थापिली \ मने मना पूजा केली \मने इच्छा पुरविली \ मन मऊली सकलाळांची \\ २\\ मन गुरु आणि शिष्य \ करी अपुलेंचि दास्य \प्रसन्ना आपआपणास गति अथवा अधोगति \\३\\ साधक वाचक पंडित \ श्रोते वक्ते ऐका मात \नहीं नहीं आन दैवत \ तुका म्हणे दुसरे \\
दिवाकर अनंत घैसास म्हणतात
.............ऐका वेगळ्या चालीमधे रचलेला हा तुकाराम महाराजांचा अभंग मोठे तत्वज्ञान सांगतो , मन हेच मुख्या परामार्थसाधन आहे व त्याची नित्य प्रसन्नता हेच परम साद्य आहे. प्रसन्नता म्हणजे काय ? उत्साहाने ओंसनडून चंचल होणे नव्हे . प्रसन्नता म्हणजेच शांती समाधान . ज्याचे मन सम अवस्थेत असते त्याने जन्ममरणरूपी संसार जिंकला आहे .इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थिताम मनः .तसेच बंध आणि मोक्ष याना कारण मनच आहे. मन एव मनुष्याणां कारणं बांध मोक्षयोः ज्याने मन जिंकले त्याने जगच जिंकले 'इन्द्रिया मधे मन म्हणजे मीच आहे.' असे भगवंताचे म्हांणणे आहे श्रद्धा हेच मनाचे बलस्थान आहे.तिनेच मनुष्य पाशाण मुर्तित देव पाहतो .मनच सर्वंची आई आहे कारण ब्रह्मदेवाने सृष्टि उत्पन्न केली ती मनानेच संकल्पपूर्वक केली आहे..मानस प्रजास सृष्टि रूप झाली . मानवी मन हे विश्वमनाशी एकरूप झाले की तेथेच परमेश्वरी शक्ति प्रगट होते सर्व भेद मनानेच निर्मिले जातात . ....
No comments:
Post a Comment