समचरणदृिष्ट विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृित्त राहो ॥1॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुिश्चत झणी जडों देसी ॥2॥
तुका ह्मणे त्याचें कळलें आह्मां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत॥3॥
दिवाकर अनंत घैसास म्हणतात :........तुकाराम्बुवाना एकच आस लागून राहिली आहे कि ज्या विठ्ठ्लाचे चरणही सम आहेत व दृष्टीही सम आहे व जो विटेवर उभा असून फारच सुंदर दिसत आहे ,त्या विठ्ठ्लाचे रूप न्याहाळीत मनाच्या सर्व वृत्ती एकवटून राहोत .म्हणूनच ते श्री हरीला विनवणी करीत आहेत कि हे हरी मला मायेच्या क्षेत्रातील आणखीन दुसरा कोणताही पदार्थ नको आहे मझ्या मनात त्याची जरासुद्धा वासना अतृप्त इच्या राहू देयू नकोस .भक्ताने आपल्याकडून भगवंताच्या ठिकाणी कितीही प्रयत्नाने मन लावण्याचा अभ्यास केला तरी त्यावर श्रीहरी ची कृपा होईल तरच मन तेथे स्थिर होणार . हे भाक्तीमार्गा चे रहस्यच सांगताहेत ......ददामि बुधीयोगं तं तेन मामुपयान्ति ते . असे श्री कृष्णाचे गीतेत वचन आहे बुद्धीची जोडणी भगवंताशी होण्यास भगवंताचेच कृपा बळ उपयोगी पडते 'मत्पर' असून जो 'युक्त ' असतो तोच भक्त खरा योगी . एकट्याच्या बळावर चित् एकाग्र होणे नाही . तुकारामबुवा पुढे म्हणतात "देवा ,ब्रह्मदेव इंद्र आणि इतर उच्च स्वर्गातील गती व स्थान म्हणजे दुखाचीच कथा ! क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ! असे जीव पुन्हा मृतुलोकी जन्माला येणारच ! त्याचे इगित मला कळले आहे . त्या साठी केले जाणारे यज्ञ दान आदी कर्माचरण सगळे नष्ट होणारे असते तेव्हा हे हरी तू माझ्हे मन तिकडे वळूच देऊ नकोस . मला माझ्या मनाची खात्री नाही !" इथे भक्त आत्मनिवेदन करीत आहे . देवाला शरण आहे . पर्यायाने समदृष्टी ने जगाकडे पहावे व आपल्या चारणाकडून आचारंही समतोल व्हावे असे हे गूढ मागणे आहे.
No comments:
Post a Comment