Blogger: My Inward Eye..... - Create post

LinkWithin

http://kundha.blogspot.com http://prajaktad.blogspot.com

Saturday, December 26, 2009

सात सुरांची रचना कशी झाली असावी .

संगीतातील स्वरसाप्तकाचा विकास कसा झाला हा एक संशोधनाचा विषय होईल .प्राचीन संगीतात तीन ते चार च स्वरांचा अंतरभाव होता. आणि हे ही स्वर कोठून निर्माण झाले असावेत असा एक गूढ प्रश्न मनाला पडतो . जंगलातून शिकार करताना कानावर पडण्यार्या पशुपक्ष्याच्या विविध ध्वनीची
हुबेहूब नक्कल करण्याच्या सहज प्रवृत्ती तून काही विशिष्ट ध्वनीचे आकर्षणं तत्कालीन मानवाला वाटले असावे व ते ध्वनी तो आपल्या मुखातून उच्चारू लागला . असे मोजके तीन चार ध्वनी उच्चारणे व त्या द्वारा आपल्या भावना प्रगट करणे या क्रीयेतुनच संगीतातील स्वर निर्मिती झाली असावी . प्राचीन काळी संगीत तीन चार स्वरातच गायले जाई . रीग्वेदात तीनच स्वरांचा उल्लेख आहे .:- १) अनुदात २) उदात ३)स्वारीत
सा रे ग म या चार सुरातच संगीत गायले जात. आज ही आपल्याकडे परंपरेने गाण्यासारखी लोकगीते एकली तर असे आढळते कि त्यातही केवळ दोन तीन स्वरांचा वापर आहे .

सात सुरांची रचना कशी झाली असावी :-
या सात स्वरांच्या निर्मिती बाबत जी अनेक शांशोधने आहेत त्यातील एक जास्त तर्कसंगत व पटणारे संशोधन कै. गोविंदराव टेंबे यांनी आपल्या "कल्पना संगीत " या ग्रंथात दिले आहे - त्याचा सारांश असा की पुरुष कंठातून निघालेल्या चार ध्वनीचे अनुकरण स्त्रिया ही करू लागल्या । स्त्रीयाचा
स्वर पुरुषा पेखा सामान्यापणे निसर्गतः दीड पटीने उंच असतो . पुरुषांचे आवाजातील, मूळ सा रे ग म हे स्वर तसेच स्त्रीयाच्या दीड पट उंचीच्या आवाजातील सा रे ग म असे दोन भिन्न स्वर गट प्रत्यक्ष प्रचारात सतत येऊ लागले . त्यालाच पुढे स्वर ही संज्ञा मिळाली व हे भिन्न भिन्न आठ स्वर प्रचारात आले . कालांतराने हे चार स्वरांचे दोन्ही गट एकत्र येऊन एक सप्तक संगीतात सिद्ध झाले व संगीताचा प्रवास या सात स्वरांच्या माध्यमातून होऊ लागला .

सा पासून प हा दीड पट उंचीचा आहे. स्त्रीयाचा सा हा पुरुषांचा प हा स्वर होतो . आपल्या भारतीय संगीत शास्त्रात स्वर सप्तकात सा व प हे दोनच स्वर अचल मानले आहेत . ते कधीही विकृत होत नाहीत . थोडक्यात असे म्हणता येईल की मूळ चार सुरातून निर्माण झालेले सप्तक हे क्रिया मूळ चार स्वरांच्या दीड पट उंचीच्या स्वरामधून निर्माण झाली असावी.
पं.अरविंद गजेंद्रगडकर

1 comment:

GD said...

Enjoyed reading this interesting post.