Blogger: My Inward Eye..... - Create post

LinkWithin

http://kundha.blogspot.com http://prajaktad.blogspot.com

Monday, August 2, 2010

तुकाराम गाथा

जन विजन झाले आम्हां । विठ्ठलनामाप्रमाणें।१।

पाहे तिकडे मायबाप । विठ्ठल आहे रखुमाई ।२।

वन पट्टण एक भाव । अवघा ठाव सरता झाला ।३।

आठव नाही सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ।४।

दिवाकर अनंत घैसास म्हणतात:
थोड्या शब्दात महान अर्थ सांगणे हे तुकारामांच्या अभंगरचनेचे लक्षणच आहे. या लहानशा अभंगात फार उच्च मनोवस्थेचे वर्णन ते साध्या शुब्दात सांगत आहेत ....ज्याची भक्ती अंतरंगातील आत्मरूप परमेश्वरावर जडते त्याला विशिष्ट जागी बसून साधना करावी लागत नाही. योगसाधनेच्या प्रारंभी मात्र एकांतात, शुद्ध जागी, व अति उंच, न अति खोल अशा आसना वर, निवांत पणे बसावे, भोवती वर्दळ नको, घाण नको, ठराविक वेळी द्यानाला बसावे असे नियम घातलेले असतात .गीतेतही अद्यायात याचा उपदेश केलेला आहे . पण त्याची आवश्यकता मन बाहेरच्या विषयांकडून आंत वळण्यासाठी आहे.
एकदा अंतरी गोडी लागली व विठ्ठलनामाच्या नादस्पंदनात जीवभावाचे द्वैत विरघळून जाऊ लागले कि मग अरण्य काय किंवा भर शहर वस्ती काय , सकाळ काय नि दुपार , रात्र , सायंकाळ काय , भक्ताला जेथे तो असेल तेथेच सहजगत्या विठ्ठल रखुमाई हे पुरुश्प्रकृतीरूप अद्वैतच अनुभवास येत असते . मग सर्व ठाव स्थानाचे वेगळेपण व मीपणाचे वेगळेपण ही सरते होते, ओसरते. त्याचे अस्तित्वच उरत नाही . तो भक्त म्हणजे हरीची गोडीचं मूर्तिमंत झाली असा लोकानां प्रत्यय येतो . विठ्ठल नामाच्या तराजूत मग जनसंमदॅ अथवा अरण्य , वन किंवा नगर यांचे वजन सारखेच होते. हवे - नकोच ओसरते . अशा वेळी सुख म्हणजे नेमके काय आणि दुख म्हणजे काय याची आठवण सुद्धा रहात नाही . मग भक्त सुखदुख पलीकडच्या असीम आनंदात मोठ्या कौतुकाने नाचत असतो . तो साक्षात आनंदच होऊन राहातो .

.

No comments: